अयोध्येसह अमेरिकेतही जय श्रीरामाचा जय घोष…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अयोध्या आणि भारतासह सबंध जगातील श्रीराम भक्तांचा जय श्रीराम, जय श्रीरामाचा जयघोष निनादत आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन येथील श्रीराम भक्तांनी जय श्रीरामाचा जयघोष करीत भगवा उंचावून आनंद साजरा केला.

यावेळी रामभक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. विश्व हिंदू परिषदेने यावेळी छोटी पदयात्रा काढली होती. यावेळी “आम्ही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा जल्लोष साजरा करत आहोत. ४०० वर्षांच्या संघर्षानंतर आणि बऱ्याच मोठ्या बलिदानानंतर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही पंतप्रधानांचे आभारी आहोत,” असं मत वॉशिंग्टन डीसीमधील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सापा यांनी व्यक्त केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here