Ahmadnagar Corona : जिल्ह्यात वाढले १६ नवे रुग्ण, आज २१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर : जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६० इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली. 
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीरामपूर ०२, मनपा ०४- मुकुंदनगर ०१, भोसले आखाडा ०१, सावेडी नाका ०१, पदमा नगर ०१. कॅन्टोन्मेंट – ०३, राहुरी०२- सोनगाव ०१, राहुरी शहर ०१ नगर ग्रामीण ०२ – जेऊर ०२, कर्जत ०१, श्रीगोंदा ०१, नेवासा ०१.
दरम्यान, आज एकूण ३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १२३, संगमनेर २२, राहाता १०, पाथर्डी ४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ११, राहुरी १, शेवगाव १,
कोपरगाव १, कर्जत ३.
बरे झालेले एकूण रुग्ण:४५८०
उपचार सुरू असलेले रूग्ण:२१६०
मृत्यू: ८४
एकूण रूग्ण संख्या: ६८२४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here