Education : प्राथमिक शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या होणार… प्रशासकीय बदल्या अखेर रद्द

0
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी
अहमदनगर – राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या फक्त विनंतीनूसार बदल्या होणार असून सर्व प्रकारच्या प्रशासकीय बदल्या महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे रद्द केल्या असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदिप भालेराव यांनी दिली.
राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊन फक्त विनंती बदल्या करण्यात याव्यात अशी निवेदन देऊन मागणी केली होती. या मागणीनुसार लवकरच कार्यवाही करण्याबाबत माननीय ग्रामविकास मंत्री यांनी स्पष्ट संकेत दिले होते. शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ व शासन निर्णय १५ जुलै २०२० नुसार या बदल्या करण्यात याव्यात, असे सूचित करण्यात आले होते. मात्र एक शासन निर्णय ऑफलाईन तर दुसरा शासन निर्णय ऑफलाईन असल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनामध्ये बदल्या करण्यासंबंधी प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.

राज्यामध्ये कोविड-१९ या महामारीच्या प्रचंड  प्रादुर्भावामुळे आणि शिक्षकांच्या असणाऱ्या जास्त संख्येमुळे या बदल्या करताना प्रचंड अडचणी येणार होत्या. या सर्व बाबी टाळण्यासाठी व कोणत्याही प्राथमिक शिक्षकांची गैरसोयीने बदली होऊ नये म्हणून फक्त विनंती बदल्या करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने ५ ऑगस्ट २०२० रोजीफक्त विनंती बदल्या या समुपदेशनाने करण्यात येण्याबाबत नवीन शुद्धिपत्रक काढून राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दिलासा दिला आहे, असे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी म्हटले आहे.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत राज्याध्यक्ष देविदास बस्वदे , राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्यासहअहमदनगर संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, विष्णू बांगर,प्रदिप
चक्रनारायण, संदीप भालेराव,संजय सोनवणे,शकील बागवान,शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे, संभाजी तुपेरे, विलास लवांडे, रविंद्र अनाप, सुधीर बोऱ्हाडे, जनार्दन काळे, ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, दत्तात्रय कराड, पांडुरंग देवकर
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके, सरचिटणीस संगीता घोडके, बॅंकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, उज्वला घोरपडे, संगीता निगळे, मनिषा क्षेत्रे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here