तुळशी व विहार भरले

  0

  विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
  मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही 5 तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली 20 टक्के पाणी कपात कायम राहणार आहे.
  विहार तलाव 5 ऑगस्ट रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 27,698 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी 31 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये 16 जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. विहार तलाव हा सर्वात लहान 2 तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लीटर (9 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
  पावसाळ्यामध्ये जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये फक्त सुमारे 34 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सदर जलसाठा जुलै 2019 मध्ये 85.68 टक्के व जुलै 2018 मध्ये 83.30 टक्के होता. मुंबईचा पाणीपुरवठा 31 जुलै 2021 पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here