‘बळीराजा चेतना योजना’ वाया गेल्याचं सांगत राज्य सरकारनं केली रद्द

0

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ राज्य सरकारने बंद केली आहे. मागच्या ही योजना 2016 मध्ये जाहीर झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने 2015 मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने या योजनेचा आढावा घेतला. उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये कोणतीही घट झाली नसल्याचं स्पष्ट झालं. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2001 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रात 32 हजार 605 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार होतं त्या कालावधीत 2015 ते 2018 या कालावधीत 14 हजार 989 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. दरम्यान, ’बळीराजा चेतना योजना’ अपयशी ठरल्याचे सांगत ठाकरे सरकारने ही योजना बंद केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपाची काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, अर्थ खाते, जलसंपदा, महिला आणि बाल कल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्यात यावे असाही प्रस्ताव फडणवीस सरकारने मांडला होता. सुरुवातीला ही योजना मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी अनुक्रमे 48.9 कोटी आणि 45.7 कोटींच्या तरतुदींसह सुरु करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here