Crime : शाळकरी विद्यार्थीनीला जबरदस्ती शेतात नेऊन बलात्कार

0
पाथर्डी तालुक्यातील वाळुंज येथील घटना 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  
पाथडी तालुक्यातील वाळुंज येथे राहणार्‍या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस रात्रीच्या वेळी तोंड दाबून घरातून उचलून शेतात नेऊन बलात्कार केला. ही घटना दि. 1 ऑगस्टला घडली असून काल दि. 5 ऑगस्टला विद्यार्थीनीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर उघडकीस आली. 
दरम्यान, या मुलीने आरडाओरड केला असता तो ऐकून तिची आई व आजी तिचा शोध घेत पोहोचल्या. तोपर्यंत आरोपी, पोलिसांना फिर्याद दिली तर तुझ्या आई-वडिलांना जीवंत सोडणार नाही, असे धमकावून पळून गेला.

दरम्यान, काल गुरुवारी या विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम ३७६ (२) (आय) (३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here