Karjat : पुरस्कार मिळाला की कामाची जबाबदारी आणखी वाढते – आदर्श उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे

3
फोटो ओळी : प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडून आदर्श तलाठी पुरस्कार स्वीकारताना कर्जतचे तलाठी सुनील हसबे. यावेळी तहसिलदार नानासाहेब आगळे, विशाल नाईकवडे 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ६

कर्जत : प्रशासकीय सेवेत काम करीत असताना त्या कामाचा सन्मान होणे आवश्यक असते. त्याच कार्याचे रूपांतर पुरस्कारात होते. काम करीत असताना पुरस्कार मिळाल्यास त्या कामाची जबाबदारी आणखी वाढत असते, असे मत आदर्श उपजिल्हाधिकारी तथा कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. ते बुधवारी उपविभागीय कार्यालय अंतर्गत महसूल दिनाच्या अधिकारी – कर्मचारी सन्मान प्रसंगी बोलत होते. यावेळी कर्जतचे तहसिलदार नानासाहेब आगळे, जामखेड तहसिलदार विशाल नाईकवडे, नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांच्यासह उपविभागातील सर्व महसुल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महसूल दिनाचे औचित्य साधत कर्जत उपविभागीय कार्यालय अंतर्गत कर्जत – जामखेड महसूल विभागात सन २०१९-२० या साली उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सन्मान बुधवार दि ५ रोजी कर्जत तहसील कार्यलयात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कर्जत उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कर्जत आणि जामखेड तालुक्यातील लोकाभिमुख कार्य करणारे नायब तहसिलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, शिपाई यासह पोलीस पाटील यांचा सन्मानपत्र देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार – सुरेश वाघचौरे, प्रकाश मोरे, ज्योतीप्रकाश जायकर. मंडळ अधिकारी – प्रकाश कुंदेकर, नंदकुमार गव्हाणे. अव्वल कारकून – मोहसीन शेख, निलेश वाघमारे, परमेश्वर घोडके, बाळासाहेब लटके. तलाठी – सुनील हसबे, धुळाजी केसकर, सुजाता गुंजवटे, सुखदेव कारंडे, विकास मोराळे, प्रमोद कटारनवरे. लिपीक – किर्ती कदम, संजय दुधभाते, सरफराज शेख. शिपाई – शीला ढाकणे, महादेव सरोदे, शिवाजी गवारे. कोतवाल – जालिंदर सकट, महेबूब शेख तर पोलीस पाटील म्हणून ईश्वर जोगदंड आणि महादेव वराट यांचा कर्जतच्या प्रांताधिकारी तथा आदर्श उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार नानासाहेब आगळे, जामखेडचे आदर्श तहसिलदार विशाल नाईकवडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांनी केले तर आभार तलाठी प्रशांत जमदाडे यांनी मानले.

आदर्श उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे आणि आदर्श तहसिलदार नाईकवडे यांचा कर्जत उपविभागातर्फे सन्मान

१ ऑगस्ट महसूल दिनानिमित्त नाशिक विभागात सन २०१९ -२० साली आदर्श उपजिल्हाधिकारी म्हणून कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे तर आदर्श तहसिलदार म्हणून जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवडे यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. कर्जत उपविभागातर्फे या दोन्ही नुतन आदर्श अधिकाऱ्याचा सन्मान यावेळी करण्यात आला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here