शब्दांकन ः शफीक बागवान, श्रीरामपूर, (9860400685)
संकलन ः प्रदीप आहेर, श्रीरामपूर

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. दिलेला शब्द पाळणे, कर्तृत्व आणि जनसंपर्क या गोष्टींबरोबरच आणि हाती घेतलेलं काम तडीस लावण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाच्या कार्यपद्धतीमुळे यशस्वी राजकारणी नव्हे तर एक उत्कृष्ट समाजकारणी म्हणून नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता असतांना विकासप्रक्रिया कशी राबवायची असते याचे उत्तम उदाहरण नगराध्यक्षा आदिक यांनी दिले आहे. आज त्यांचा वाढदिवस यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा पत्रप्रपंच ..
अनेक संकट असतांना उत्कृष्ट काम कसे करावे, याचा आदर्श संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी ठेवला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे अनेकांचे आशीर्वाद घेत विकासाचे शिवधनुष्य खांद्यावर पेलवत विकास कामांची एकेक वीट ते रचत आहेत.
माणसाने कुणाच्या पोटी जन्माला यावं, हे आपल्या हातात नसलं, तरी ज्या कुटुंबात आपण जन्माला आलो, त्या परिवाराच्या चांगल्या गुणांचे वारसदार होणं हे नक्कीच आपल्या हातात असत. या तालुक्यावर शहरावर नव्हे संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांचे काही अजरामर उपकार आहेत असे गोविंदरावजी आदिक साहेबांचा आशीर्वाद आणि अविनाश आदीक यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा आदिक आदर्श समाजकारणाचा वारसा पुढे चालवत आहेत.
नि:स्वार्थी, प्रामाणिक आणि आदर्शवत समाज कारणाचे नेतृत्व अनुराधा ताईंनी तरुणाईपुढे ठेवला आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत मागील पाच वर्षात सातत्याने जनतेसोबत राहून, जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून अनुराधा ताईंनी सर्व सामान्य जनतेच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
अनुराधाताईंच्या काळात वाखाणन्यासारखे काम झाले नाही असे काही समदुखी खाजगीत चर्चा करतात तेंव्हा अनुराधा ताईंनी विकास कामाकडे दुर्लक्ष केले असेही म्हणता येणार नाही, हे मला सांगावेसे वाटते. राजकारणात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून अनुराधाताईंनी अल्पावधीतच आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे.
जिव्हाळा प्रेम देणार्या व्यक्ती भोवती आपण नेहमीच गर्दी पाहतो. बर्याच वेळा लोकप्रियता आणि सभोवताली गर्दी वाढली की काहींना आकाश ठेंगणे वाटू लागते. परंतु नगराध्यक्षा आदिक यांनी तसे कधीच होऊ दिले नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वर्गीय खासदार गोविंदराव आदिक यांच्यासारख्या उत्तुंग व दूरदृष्टी नेत्यांचे त्यांच्यावर झालेले संस्कार म्हणावे लागतील.
समाज आणि राजकारणातील नेत्यांचे वाढदिवस साजरे करणे हे नवे नसले तरी काही वेळेस काहीच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम करावासा वाटतो. नगराध्यक्षा आदिक यापैकीच एक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्यासह कुटुंबाच्या वतीने त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांनी किती मोठे व्हावे, यापेक्षाही त्यांचे नेतृत्व सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी सतत तेवत रहावे, अशी मनोकामना व्यक्त करतो.