Shrigonda : तीन ठिकाणी घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील आढळगाव घोडेगाव तसेच टाकळी लोणार या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोऱ्या करून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव याठिकाणी मिसाळ वस्ती वरती मारुती बापू मिसाळ हे शेती करून उपजीविका भागवतात दि 7 आगस्ट रोजी जेवण करून झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या भिंतीस शिडी लावून घरात प्रवेश घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले दोन हजार रुपये रोख रक्कम तसेच तीस हजार रुपये किमतीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या गळ्यातील सोन्याचे पत्ते तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स पंधराशे रुपये किमतीचे पायातील चांदीचे करंगळी व मासुळे इतका मुद्देमाल मिसाळ यांच्या घरातून चोरट्यांनी लंपास केला आहे.

तसेच घोडेगाव शिवारात राहणाऱ्या रेखाबाई मारुती गिरमकर यांच्या घरातील चार हजार रुपये रोख रक्कम 4500 रुपये किमतीचे कानातील सोन्याची कुडके बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले झुबे चोरट्याने ओरबडून नेल्यामुळे रेखाबाई मारुती गिरमकर या किरकोळ जखमी झाले आहेत, असे मिळून गिरमकर आणि मिसाळ यांचे दोघांचे मिळून तब्बल 84 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
तसेच टाकळी लोणार येथील शरद बापू कानगुडे यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची युनीकॉन गाडी तसेच घरातील कपाटात ठेवलेले 45 हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. ही माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन याबाबत सविस्तर माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली त्या ठिकाणी तात्काळ काहीच वेळात श्रीगोंदा कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा पंचनामा करून त्यांनी बादली 394, 397 नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here