आत्महत्येपूर्वी केले फेसबुक लाईव्ह, चाहत्यांना म्हणाली कोणावर विश्वास ठेवू नका, वाचा कोण आहे ही अभिनेत्री
मनोरंजन क्षेत्राला हे वर्ष खूपच वाईट जात आहे. काही कलाकारांचे नैसर्गिक मृत्यू तर काही कलाकारांनी केलेल्या आत्महत्या यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आता एका भोजपूरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एका कंपनीसह एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाला आहे.

अनुपमा पाठक असे या भोजपूरी अभिनेत्रीचे नाव असून पत्रकार मनिष झा याच्या सह मालाडच्या विस्डम कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी केले फेसबुक लाईव्ह, चाहत्यांना म्हणाली कोणावर विश्वास ठेवू नका. त्यानंतर रात्री काशिमिरी येथील राहत्या घरी तिने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांना तिच्याघरी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यावरून पत्रकार मनिष झा व विस्डम कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.