प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे दोन चिमुकल्यांसह आई-वडिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण नांदगाव हादरले आहे.

37 वर्षीय समाधान चव्हाण, 32 वर्षीय भारतीबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांची सहा वर्षाची मुलगी आराध्या चव्हाण आणि 4 वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण अशी मृतांची नावे आहेत.
समाधान चव्हाण हे रिक्षा चालक आहेत. हे संपूर्ण कुटुंब रात्री घराबाहेर झोपले होते. यावेळी अज्ञातांनी चौघांची गळा चिरून हत्यात केली. हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडा, जबरी चोरी किंवा आणखी या हत्येमागे काय कारण असू शकते याचा शोध घेत आहे.