Beed : जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १४ गावांसह ६ शहरातील एकूण ४० ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १४ गावांसह व ६ शहरांमधील एकूण ४० ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल,
परळी तालुक्यातील दाऊतपुर, बेलंबा या २ गावात, अंबाजोगाई तालुक्यातील बाबळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र उजनी हा परिसर, आष्टी तालुक्यातील धानोरा, मुर्शदपूर व कोयाळ हे गाव या ३ गावात, गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी, राहेरी (संपूर्ण गाव), वडगाव ढोक, मन्यारवाडी व पांढरवाडी (संपूर्ण गाव) या ५ गावात, शिरूर तालुक्यातील मातोरी अंतर्गत पाडळसिंगी मेन रोड (222 हायवे) हा परिसर, जाटवड अंतर्गत नागनाथ नगर या २ भागात,
तसेच बीड शहरातील गणेश नगर औटि मंगल कार्यालय, बलशाली शिक्षक कॉलनी, पिंगळे गल्ली, सावता माळी चौक निखिल रेसिडेन्सी, अंकुश नगर, कारंजा रोड, कुंभार वाडा रविवार पेठ, विप्र नगर, मित्र नगर जुने शिवाजी विद्यालय व मोमीन पुरा या १० भागात, परळी शहरातील माऊली नगर, इंदीरा नगर व सावतामाळी नगर या ३ भागात, अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा, खतीब गल्ली, लखेरा गल्ली मंगळवार पेठ, रविवार पेठ, हनुमाननगर रोड मंगळवार पेठ व सदर बाजार या ६ भागात, माजलगाव शहरातील पोलीस वसाहत भाटवडगाव, धारूर शहरातील उदयनगर, केज शहरातील वसंत विद्यालय परिसर, स्वामी विवेकानंद शाळा परिसर, शाहूनगर वकीलवाडी, धारूर रोड व गोपाळ वस्ती- कानडी रोड या ५ भागात, या १४ गावात व शहरांमधील वरील संबंधित २६ परिसरात कंटेनमेंट झोन (Containment Zone) घोषित करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
या सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येऊन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here