Kada : प्राथमिक आरोग्य केंद्राला पोलीस निरीक्षक बडे यांची भेट

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आष्टीचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब बडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कड्याच्या सुसज्ज दवाखाना परिसराची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिका-यांच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी आरोग्य केंद्राकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आष्टीत पोलिस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेले पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी बडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिका-यांच्या आरोग्य सेवेबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांनी पोलिस निरिक्षक बडे यांचा सत्कार करण्यात केला. याप्रसंगी डाॅ. अनिल आरबे, डाॅ. नितीन राऊत, पत्रकार राजेंद्र जैन, पो. काॅ. प्रशांत क्षीरसागर, मनोज खंडागळे, अजीत शिकेतोड यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here