त्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ञास न देण्याचा सल्ला
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेञातील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती कोरोना बाधित आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका रुग्णालयातील डाँक्टरासह त्यांच्या कुटुंबाची व रुग्णालयातील परिचारिकांचे स्ञाव तपासणीसाठी घेतले असता डॉक्टरांच्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीसह एक परिचारिका कोरोना बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर राहुरी कारखाना येथील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असे एकूण तीन व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत. त्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या औषध दुकानदारास स्ञाव तपासणी करण्यास सांगितले असता त्या राजकीय बाधित रुग्णाकडून आमच्या माणसांना स्ञाव घेण्यासाठी ञास देवू नका, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांस दिला आहे.
देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोनाचे एकूण 18 रूग्ण सापडले असता त्यातील 11 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील एकावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 6 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
राजकीय क्षेञातील कुटुंबातील चार रुग्ण कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता देवळाली प्रवरा येथील एका रुग्णालयातील परिचारिका तर त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरच्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारा राहुरी कारखाना येथील विद्यार्थी कोरोना बाधित आढळला आहे.
या राजकीय नेत्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना प्राथमिक वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी त्या राजकीय व्यक्तीचा औषध दुकानदार यांच्याशी संपर्क आल्याने त्या औषध दुकानातील चौघांना स्ञाव तपासणी करुन घेण्यास सांगितले असता औषध दुकानदाराने त्या राजकीय व्यक्तीस भ्रमणभाषवर संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय मासाळ स्ञाव तपासणीसाठी ञास देत आहे, असे सांगितले.
त्या राजकीय व्यक्तीने डॉ. मासाळ यांना भ्रमणभाषवर संपर्क साधून आमच्या लोकांना विनाकारण ञास देत आहात. हे तातडीने थांबवा नाहीतर परीणाम वाईट होतील, असे तो राजकीय व्यक्ती बोलल्याने डॉ. मासाळ यांनी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणार नाही. यापुढे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध नगरपालिकेने घ्यावा. यापुढे कोणत्याही व्यक्तींचा शोध घेतला जाणार नाही, असे ही डॉ. मासाळ यांनी सांगितले.
tadalafil vs sildenafil – buy generic tadalafil online tadalafil online pharmacy