प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात काल गुरुवारी घडली. केशव बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. अखेर दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
केशव हा मित्रासोबत काल दुपारी भोकर येथील सुनील फासाटे यांच्या वडजाई परिसरातील विहिरीत होण्यासाठी गेला होता. गेल्या तीन दिवसांपासून केव्हा आपल्या वडिलांसोबत पोहायला शिकत होता. परंतु काल आई वडील बाहेरगावी गेल्याने तो एकटाच मित्रासोबत दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहिरीवर होण्यासाठी गेला होत असताना त्याने विहिरीच्या कठड्यावरून पाण्यात उडी मारली आणि पाण्याबाहेर आलाच नाही.
याप्रसंगी विहिरीच्या कट्ट्यावर सुनील फासाटे बसलेले असल्याने त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले परंतु विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने केशवला वाचविण्यात अपयश आणि सदर घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला कळाल्यानंतर घेण्यासाठी जलतरणपटू घटनास्थळी पोहोचले परंतु काल रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
बाळासाहेब चव्हाण यांचा केशवा मुलगा होता. त्याच्या मागे आई-वडील तीन बहिणी असा परिवार आहे. बाळासाहेब यांना तो एकटाच असून यापूर्वी यांच्या एका मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
buy tadalafil online safely – generic tadalafil reviews tadalafil online canadian pharmacy