जुन्नरचे माजी सभापती दशरथ पवार यांचं कोरोनाने निधन

0

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पुणे : जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचा कोरोनाशी लढा अयशस्वी झाला आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतू त्यांना मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
1992 ते 1997 या काळात त्यांनी जुन्नर पंचायत समितीचं सभापतीपद भुषवलं होतं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केली. त्यामुळे लोकांच्या ते कायमच आठवणीत राहिले. पवार यांची जनतेशी अतिशय चांगली नाळ होती.
दशरथ पवार आणि अजित पवार यांचे जवळचे संबंध होते. त्यांचं अतिशय चांगलं बोलणं होत असे. अजित पवार जेव्हा जेव्हा जुन्नर दौर्‍यावर यायचे तेव्हा ते ‘आमची भावकी कुठंय?’ अशी आवर्जून विचारपूस करायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here