शत्रुघ्न सिन्हा एका दूर्मिळ नाण्याचा हवाला देत म्हणाले…कमळाचे राज्य येईन तेव्हाच राम मंदिर बनेल

  0

  …असं काय आहे या दूर्मिळ नाण्यावर ? का म्हणाले शत्रूघ्न सिन्हा असे… वाचा सविस्तर, पाहा हे दूर्मिळ नाणे

  नुकताच 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन व शीलान्यास सोहळा पार पडला. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करीत देशवासियांना राम मंदिर निर्माणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याची सध्या खूप चर्चा होत आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा यांनी 1818 मधील एका दुर्मिळ नाण्याचे फोटो ट्विट केले आहे. त्या नाण्यांवरील प्रतिकांचा हवाला देत शत्रुघ्न म्हणाले,

  “एक अजब योगायोग आहे, १८१८ साली दोन आण्याचं नाणं होतं. या नाण्याच्या एका बाजूवर भगवान श्री राम यांचं चित्र होतं, तर दुसऱ्या बाजूस कमळाचं फूल होतं. असं वाटतय की हे प्रतिक होतं जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच अयोध्येत दिपोत्सव साजरा केला जाईल. भगवान श्री राम यांचं भव्य मंदिर बनेल. जय जय श्री राम.” अशा आशयाचं ट्विट करुन शत्रुघ्न सिन्हा यांनी राम मंदिराचा आनंद व्यक्त केला आहे.”

  वाचा सिन्हा यांचे ट्विट

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here