Beed : शहरातील व्यावसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट – मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार

0
संबंधिताना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच आपली तपासणी करून घ्यावी 
बीड – शहरात व्यवसायिक, कर्मचारी वर्ग, कामगार व इतर यांची कोविड-१९  संदर्भात अॅन्टीजन तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून सहा अॅन्टीजन तपासणी केंद्र कार्यन्वित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य यंत्रणेस दिले आहेत.
शहरातील दुकानदार व व्यवसायिकांनी त्यांना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रत्येक तपासणी केंद्रावर एका तासामध्ये साधारणतः 50 व्यक्तींची अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी बीड शहरातील व्यवसायिक आणि तपासणी करण्यासाठी येण्याच्या वेळा त्यांना कळविण्यात आलेले आहेत. यामध्ये ८ ते 10 ऑगस्ट २०२० दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली जाणार असून त्याचे तपशीलवार वेळापत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यासाठी बीड शहरात या ६ तपासणी केंद्रावर  वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश करून टीम तयार करण्यात आले आहेत. शहरातील बलभीम महाविद्यालय,  एमआयडीसी रोड वरील मा वैष्णव पॅलेस, अशोक नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगर रोडवरील चंपावती प्राथमिक शाळा येथे २ आणि विप्र नगर येथील राजस्थानी विद्यालय असे ६ केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत.
बीड शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यावसायिक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी दिनांक ०८, ०९ व १० ऑगस्ट २०२० रोजी करण्यात येणार आहे.
बीड जिल्हयातील आरोग्य यंत्रणेमार्फत कोविड-१९ च्या प्रतिबंधाची कार्यवाही सुरु आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूमुळे होणा-या कोव्हीड-१९ या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ आॅगस्ट २०२० पासून लागू केला आहे. जिल्हयात कोविड -१९ च्या प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना चालू आहेत. त्या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोबीड-१९) प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मकः कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून स्वातंत्र्यरित्या निर्गमीत करण्यात येत आहे. व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८६० (४५) याच्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here