Beed : जिल्ह्यातील ‘या’ १९ ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथिल

0
बीड – जिल्ह्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने १९ संबंधित भागातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, असे  जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील शिवाजी नगर, स्वराज्य नगर, अक्सा कॉलनी, शहंशाह नगर, विद्यानगर, अजीजपुरा काली मस्जिद, कालिका नगर, आदित्य नगरी, कॅनरा बँक कॉलनी, माळी गल्ली, वीरशैव कॉलनी, सावता माळी चौक येथे २ ठिकाणी व आनंदनगर धानोरा रोड या भागात अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स कॉर्टर परिसरात, हाउसिंग सोसायटी भाग 1 व बागवान गल्ली धारूर शहरातील काशिनाथ चौक आणि गेवराई तालुक्यातील मौजे सुलतानपूर हे गाव व वरील भागातील संबंधित परिसरात असलेले कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे. या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here