पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पोलिस निरीक्षकाकडे मागणी

0

ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

देवळाली प्रवरा प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकार भारत थोरात यांना वाळू तस्कर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना निवेदन देऊन पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली. पत्रकारांवर होणारे हल्ले सातत्याने वाढत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पञकार भारत थोरात यांनी प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपशा संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते.त्या अनुशंघाने वाळू तस्कर गणपत पवार यांने  दिनांक 8 ऑगस्ट रोजी पत्रकार  थोरात यास वाळूच्या बातम्या छापतो का? असे विचारुन बातम्या छापल्या तर तुझे हातपाय जागेवर राहणार नाही. तुझा कधीही काटा काढू अशी धमकी दिली होती.  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक बहिरट यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय खेमनर ,छायचित्रकार प्रदेश अध्यक्ष किरण शेलार, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रदेश अध्यक्ष जयंत सावंत  प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र  उंडे,प्रदेश उपाध्यक्ष संतोष बोरुडे राज्य संघटक जालिंदर रोडे,  जिल्हा संघटक दीपक शिंदे,प्रविण जमदाडे,संदिप आसने, सतिष टेमक,संजय आढाव, ज्ञानेश्वर जगधने,तुषार कनगरे, भारत थोरात आदी पत्रकार  उपस्थित होते.
यावेळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  श्रीहरी बहिरट  यांना निवेदन देऊन पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.दरम्यान  मंगळवार दिनांक 11 रोजी रोजी गणपत पवार याचा हस्तक सय्यद पापा हुसेन याने पत्रकार भरत थोरात यांना ते वाळू तस्कर आहेत. त्यांच्या नादी लागू नको  ते तुझे  हातपाय मोडतील त्यामुळे तु दाखल केलेला गुन्हा  मागे घे  असा माझा प्रेमाचा सल्ला आहे असे सांगुन एक प्रकारे वाळू तस्कराकरवी धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी सय्यद पापा हुसेन याच्यावरही  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे  म्हणाले की राज्यात पत्रकारांवर सातत्याने हल्ले वाढत चालले असून राज्य सरकारने पत्रकार हल्ला विरोधी कायदा केला असून या कायद्याचा वापर पोलिस जाणीवपूर्वक करीत नाहीत. अनेक वेळा पत्रकार होणारे हल्ले पोलिसांचे अवैध वाल्यांशी  लागेबांधे  असतात  पोलीस आणि वाळूतस्करांची अनेक ठिकाणी आर्थिक मैत्रीचे संबंध असल्याने  पोलीस शक्यतो गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेतात. वाळू तस्करांचा व गाव गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here