वधू-वरांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
कडा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात अनिश्चित काळासाठी कंटेन्मेंट झोन लागू असताना लोक जमवून विधीपुर्वक लग्न सोहळा उरकणा-या वधू-वर पित्यांसह नवदाम्त्यांविरुध्द पोलिसात मंगळवार (ता.11) रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी, की मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिस पेट्रोलिंग करीत असताना कडा येथे देशमुखांच्या गढीमध्ये विनापरवाना लग्न लावण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता अनिश्चित काळासाठी कडा येथे कंटेन्मेंट झोन लागू असताना संतोष नारायण देशमुख यांचा मुलगा शुभम संतोष देशमुख (रा.कडा ता. आष्टी ) व यशवंत सदाशिव जोशी यांची कन्या श्रध्दा यशवंत जोशी ( रा.बीड) यांचा लग्न सोहळा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कड्याचे सपोनि सलिम पठाण, ग्रामसेवक आबासाहेब खिलारे, पो.ना. बाबासाहेब गर्जे, पो.काॅ. संतोष नाईकवडे, मंगेश मिसाळ आदीनी गडीत लग्नाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून पाहणी कली असता, त्याठिकाणी हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असताना विनापरवाना विधिवत लग्न उरकून घेतल्याची माहिती समजली. पो. ना. संतोष नाईकवडे यांच्या फिर्यादीवरुन संतोष नारायण देशमुख, सुरेखा संतोष देशमुख, शुभम संतोष देशमुख, (रा. कडा) तसेच यशवंत सदाशिव जोशी, विद्या यशवंत जोशी, श्रध्दा यशवंत जोशी यांच्या विरोधात संसर्गजन्य रोगाचा कोरोना प्रादूर्भाव सुरू असताना सामाजिक अंतराचे पालन न करता तसेच पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता व परवानगी न घेता लग्न लावल्याबद्दल सहा जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास सपोनि सलिम पठाण करीत आहेत.