अपघातांचा धोका कठड्याचे घडीव दगड गायब
श्रीगोंदा भिंगान मार्गे टाकळी कडेवळीत शिवारात घोड पाटावर अनेकवर्षांपूर्वीचा जुन्या पुलाचा संरक्षक कठडा सध्या धोकादायक झाला आहे. हा जुना ब्रिटीशकालीन पूल सध्या भक्कम असला तरी पुलाचा घडीव दगडांचा कठडा काही भागात तुटला असून, यामुळे या भागात नदीवर येणारे नागरिक या ठिकाणाहून भयभीत होऊन प्रवास करत आहेत हा पूल सध्या अपघातांना निमंत्रण देत आहे सध्या श्रीगोंदा भिंगान मार्गे टाकळी कडेवळीत या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत काम सुरू आहे याचं रस्त्यावर हा पूल असून रास्ता नवा आणि पूल मात्र जुनाच आहे या जुन्या रस्त्यावरील पुलाचा फारसा वापर होत नसला तरी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी नागरिक येत असतात. कठडा तुटलेला असल्याने पुलावरून थेट पाटाच्या पात्रात पडून अपघात होण्याची शक्यता आहे.
या जुन्या पुलाचे बांधकाम सन 1891 ते 1892 या दरम्यान झाले होते या उंच भक्कम पुलावर कसल्याही महापुरात कधीही पाणी आलेले नाही. यावरून त्याची बांधणी लक्षात येते. पुलाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर थांबला. सध्या या जुन्या पुलाचे ब्रिटीशकालीन घडीव दगडी असलेले संरक्षक कठडे कठडे तुटले असून, त्यामुळे हा पूल जीवघेणा झाला आहे. या ठिकाणी अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. कॅनॉल वर महिला कपडे धुण्यासाठी व नागरिक उन्हाळ्यात आंघोळीसाठी येत असतात. त्यामुळे पुलावरून एखादी व्यक्ती खाली कॅनॉल मध्ये पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.या भागात अनेक युवक भरधाव वेगात दुचाक्या दामटत असतात. त्यामुळे वाहन सरळ नदीत कोसळण्याची भीती आहे.टाकळी कडेवळीत परिसरातील घोड पुलाच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
