मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी प्रचंड पैसा जमवला – चंद्रकांत पाटील

    0

    सीआयडी चौकशीची मागणी, वाचा पाटील यांचे ट्विट

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच यामुळे अनेक कार्यक्षम अधिका-यांवर अन्याय झाला आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करु नयेत, असा आदेश दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे, असेही ते म्हणाले.

    वाचा चंद्रकांत पाटलांचे ट्विट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here