प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी – देवळाली प्रवरा शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करणाऱ्या दोन महिला व शिपाई पुरुष, असे तिघे तर राहुरी कारखाना येथील एका सरकारी कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
देवळाली प्रवरानगर पालिका हद्दीतील एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करणाऱ्या एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल नगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर नगर पालिकेने राष्ट्रीयकृत बँक सँनेटायझर करून घेण्यात आली. या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांची गुरवारी रॅपिड टेस्ट करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत व वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले. कृषी विद्यापीठात सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यामध्ये एक 24 वर्षीय महिला कर्मचारी व ठेकेदारीवरील पुरुष शिपाई, असे दोघे कोरोना बाधित आढळले आहेत.
बँकेचा ठेकेदारावरील शिपाई बँक परिसरात राहत असल्याने हा परिसर 14 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला असल्याने बँकेचे दैनंदिन कामकाज 14 दिवसासाठी बंद राहिल. या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असते. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या घरातील व्यक्तींचे स्ञाव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर ठेकेदारीवरील शिपाई यांच्या घरातील व्यक्तींचे शुक्रवारी स्ञाव घेतले जाणार आहेत. तर राहुरी कारखाना येथील सरकारी कर्मचाऱ्यांस कोरानाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने या सरकारी कर्मचारी यांच्या घरातील व भाडेकरु, असे एकूण 11 व्यक्तींची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. ते सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. तोंडावर मास्क बांधावे व सॅनिटायझरचा वापर करावा, असे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले.