Shrirampur : आपल्या मागण्यांसाठी त्यांनी दिले स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन

0
प्रतिनिधी | तिळापूर | राष्ट्र सह्याद्री 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि. १३ ऑगस्ट रोजी अभिवादन करून राहुरी तहसील कार्यालयात धनगर समाज बांधवांनी *डाॅ श्री शशिकांत तरंगे साहेब* याच्या मार्गदर्शना खाली  *धनगर ऐक्य अभियाना* मार्फत स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन दिले. *पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकर सामाजीक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मा श्री विजयराव तमनर याच्या रक्ताने निवेदन लिहीण्यात आले* .
         *★धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या★*
—————————————————————–
1) धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी..
2) देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची  अंमलबजावणी करावी
आणि 1000 कोटीची ची तरतूद तत्काळ करावी..
3)मेंढपाळांवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे..
या मागण्यांसाठी राहुरी  तालुका धनगर समाज बांधवांनी धनगर ऐक्य अभियान च्या नेतृत्वाखाली  स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून राहुरी तहसीलदार शेख यांना दिले. याप्रसंगी   बिरोबा महाराज  मंदिर राहुरी ट्रस्ट चे अध्यक्ष मा श्री काशिनाथ भाऊ खेडेकर,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजीक प्रतिष्ठाण राहुरी चे अध्यक्ष विजुभाऊ तमनर, दत्ता भाऊ खेडेकर, बुवासाहेब महाराज युवा मंच चे अध्यक्ष नरेंद्र दादा शेटे,पिंपरी अवघड गावचे सरपंच मा श्री श्रीकांत केरू बाचकर, यशवंत प्रहार संघटना चे अध्यक्ष महेश तमनर, राजुभाऊ भांड,दत्ता बाचकर, पोपट शेंडगे, माने सर,अनिल माने,राजुभाऊ वाघ,अक्षय पाटोळे, राहुल ससाने, दादाभाऊ तमनर, भगवान शेठ खेडेकर,कोडीराम बाचकर इ. समाज बांधवाने स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here