प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अहमदनगर : जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६९९ इतकी झाली आहे.
बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर १४, शेवगाव ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २०३, संगमनेर ४३, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट २४, नेवासा२१, श्रीगोंदा २४, पारनेर २०, अकोले ७, राहुरी ८, शेवगाव२५, कोपरगाव३४, जामखेड १०, कर्जत २९, मिलिटरी हॉस्पीटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:८९९३*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६९९*
*मृत्यू:१४२*
*एकूण रूग्ण संख्या:११८३४*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*