पालमकंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना; आढावा बैठक
नगरः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

पुढील शंभर दिवसांसाठी नियोजन करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी परिपूर्ण आराखड़ा तयार करा, असे आदेश त्यांनी दिले.
मुश्रीफ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगून ते म्हणाले, की ज्या बाधितांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना कोविड ह़ॉस्पिटलमध्ये बेडस् उपलब्ध होऊ शकतील.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आपल्या जिल्ह्यात आपण चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे बाधित संख्या वाढते आहे. मात्र, बाधित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहिम अधिक गतीमान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या यापुढील काळात वाढवावी, अनेक रुग्णांच्या बेडस मिळत नसल्याबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करुन
पालकमंत्री म्हणाले की, ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे जाणवणार्याी आणि ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असणा-यात रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील. रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेडस्ची संख्या, ऑक्सिजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुश्रीफ आणि थोरात यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतला. द्विवेदी आणि डॉ. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे कोरोना उपाययोजनांसंदर्भातील जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्ह्यात रुग्णांकडून काही खासगी रुग्णालये अवाजवी बील आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल
घेतली असून अशा अवाजवी शुल्क आकारणा-या खासगी रुग्णालयांचे ऑ़़डिट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, की जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यू रोखण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत. सर्वंकष नियोजन करून आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याची सूचना त्यांनी केली.
आ. जगताप यांनी महापालिका क्षेत्रासाठी अधिक आरोग्य कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आ. लहामटे यांनी दुर्गम भागात अधिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाची मागणी केली. आ. राजळे यांनी तालुकास्तरावर ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याकडे लक्ष वेधले. आ. कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी, तर आ. काळे यांनी कोपरगाव
ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या, तर येथील जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होईल, असे सांगितले. आ. पाचपुते यांनी यापुढील काळात तालुका पातळीवरही ऑक्सिजन बेडस् उपलब्ध असतील, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली
खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी
खासगी रुग्णालये जादा बील आकारित असल्याच्या तक्रारीवर प्रशासनाने महापालिका क्षेत्रात सहायक आयुक्त आणि तालुकास्तरावर सहायक कोषागार अधिकारी यांची पथके तयार केल्याची माहिती दिली.