Rahata : वाकडी येथील किराणा दुकानदारास धमकावल्याप्रकरणी आरोपी जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राहता तालुक्यातील वाकडी येथील किराणा दुकान व्यावसायिक दत्तात्रय भाऊसाहेब गाडेकर लॉकडाउन असल्या कारणाने दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना येथे आरोपी उमेश भाऊसाहेब कापसे राजेंद्र सूर्यभान सदाफळ व नानासाहेब सखाराम सदाफळ यांनी फिर्यादीला पाण्याची बाटली व वेफर्स मागितले त्यावरून फिर्यादी दुकानदार दत्तात्रय गाडेकर यांनी नकार दिला. त्यांना सदर आरोपी यांनी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश गोरे यांनी तपास करून हे आरोपी त्यांना जेरबंद करून न्यायालयात हजर केले. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कस्टडी तसेच रिमांड घेण्याचा आदेश दिला आहे. याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश गोरे यांना पो कॉ कराळे पो कॉ योगेश राऊत यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here