Beed : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वैद्यकीय देखभालीसाठी उभारण्यात आलेल्या कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.


याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना कालावधीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कर्तव्यासाठी जनतेच्या संपर्कात यावे लागते. या कोरोना योद्ध्यांची देखभाल व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या कोविड विलगीकरण कक्षाचा कक्षाचा उपयोग होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here