विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नवी दिल्ली : ’काही खासदारांसह 100 काँग्रेस नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष नेतृत्वात बदल आणि पारदर्शक निवडणुकांची मागणी केली आहे.’ पक्षातून निलंबित झालेल्या संजय झा यांनी सोमवारी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली.
विशेष म्हणजे सचिन पायलट यांच्या ’बंडखोर पवित्रा’ नंतर पक्षावर जाहीर टीका केल्याने गेल्या महिन्यात त्यांना काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या पदावरून काढून टाकले गेले. झा यांनी सोमवारी सकाळी ट्वीट केले की, ’अंदाजे 100 काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेमुळे दु: खी झाले आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्वातबद्दल आणि सीडब्ल्यूसीमध्ये पारदर्शक निवडणूकीसाठी पत्र लिहिले.’