एकुण रुग्णसंख्याने तिसरे शतक केले पूर्ण
हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षिय पुरूषाचा कोरोनाने मृत्यु …!तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात आैरंगपुर येथील एक बाधित..!
अलताफ शेख । राष्ट्र सह्याद्री
अकोले :
अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षिय पुरुषाचा १३ ॲगस्ट रोजी कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता त्याच्या संगमनेर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असताना आज सोमवार दि १७ ॲगस्ट रोजी सकाळी निधन झाले आहे यारुपाने तालुक्यातील कोरोनाचा ७ वा बळी गेला आहे.
तर सकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अैरंगपुर येथील ४५ वर्षिय पुरुषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण संख्या ३०० झाली आहे.त्यापैकी १९८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले.९५ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ७ व्यक्ती मयत झालेल्या आहे.
अकोले करानो सावधान काळजी घ्या …!विनाकारण बाहेर फिरू नका…!घरी रहा… सुरक्षित रहा..!
