आज ५२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ७८ नवे रुग्ण
अहमदनगर: जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.१९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५१७ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५१ पाथर्डी ०३, नगर ग्रा. ११, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा ०१, पारनेर ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा १५९, संगमनेर ३८, राहाता २६, पाथर्डी २९, नगर ग्रा.४८, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा २५, श्रीगोंदा १५, पारनेर २७, अकोले ०७, राहुरी १४, शेवगाव ३५,
कोपरगाव १५, जामखेड २६, कर्जत ३५ मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: ११६४७*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२५१७*
*मृत्यू :१८१*
*एकूण रूग्ण संख्या:१४३४५*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)