Ahmadnagar : ‘किसान पार्सल रेल्वे’ गाडी दर गुरवारी नगर स्थानकारवर थांबणार

  0

  अधिक माहितीसाठी शेतक-यांनी या नंबरवर संपर्क साधावा (0214) 2471381 

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  नगर –  केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात ‘किसान रेल्वे’ सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ही ‘किसान रेल्वे’ सुरु करून वचनपूर्ती केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन खराब न होता इतर राज्यात तत्परतेने जाण्यासाठी ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. किसान स्पेशल पार्सल ट्रेन नाशिकमधील देवळाली येथून निघणार असून बिहार मधील धानापूर येथे ३२ तासात पोहोचेल. ही किसान स्पेशल पार्सल ट्रेन आठवडयातून एकदा धावणार आहे. नगर रेल्वे स्थाकावर दर गुरुवारी येणाऱ्या या रेल्वेगाडीला थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

  या गाडी बद्दल अधिक माहिती देतांना मुख्य वाणिज्य निरिक्षक रामेश्वर मीना म्हणाले, अहमदनगरमधील शेतक-यांचे उत्पादन फळे, भाज्या, दूध हे इतर राज्यात या पार्सल गाडीच्या मध्यातून वेगाने पोचणार आहे. यासाठी डीप फ्रीजची व्यवस्था असलेल डबे या पार्सल ट्रेनला जोडण्यात आले आहेत. अहमदनगर रेल्वे स्थानकावरून वरुन ही गाडी सर्वमाल घेऊन मनमाड मार्गे जाणार आहे. शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात विकून व्यवसाय वाढवता यावा यासाठी शेतक-यांच्या फायदयाची ही ट्रेन अहमदनगर स्टेशनवर थांबा असल्याने शेतक-यांनी आपला फायदा करुन घ्यावा. अधिक माहितीसाठी (0214) 2471381 या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here