प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १९
कर्जत : बेलगाव (ता.कर्जत) येथील सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना एक जेसीबी आणि ट्रॅक्टर प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या पथकाने ताब्यात घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी (दि १९) गुप्त बातमीदारामार्फत प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसिलदार नानासाहेब आगळे यांना बेलगाव ता.कर्जत येथील सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची खबर मिळाली. सदर बातमीची शहानिशा करीत प्रांताधिकारी नष्टे आणि तहसिलदार आगळे यांनी तात्काळ पथक तयार करीत बेलगाव गाठले. यावेळी सदर पथकाला सीना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना एक जेसीबी आणि ट्रॅक्टर आढळून आला.
कारवाईत जप्त केलेला जेसीबी आणि ट्रॅक्टर प्रांत कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत तलाठी मुजीब शेख, गणेश सोनवणे, रवींद्र लोखंडे, विश्वजीत चौघुले, दीपक बिरुटे, कोतवाल बंडू हिवाळे यांच्यासह मंडळ अधिकारी बाबासाहेब केदार सहभागी झाले होते.