कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन कसे राखायचे हे धोनीकडून शिकावे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    0

    धोनीच्या निवृत्तीनंतर पंतप्रधानही झाले भावूक, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त, धोनीला लिहिलेल्या पत्रातून तरुणाईला संदेश

    आपल्या कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन कसं राखावं याबाबत यामध्ये मोदींनी लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पत्रात लिहिलं आहे की, ‘धोनीकडून कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन राखण्याची पद्धत शिकणं गरजेचं आहे.’

    महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्याला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भावुक पत्र लिहून धोनीचं कौतुक केलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीच्या जीवनातील प्रेरणादायी क्षणांचा पत्रात उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, ‘धोनीकडून आपल्यापैकी प्रत्येकाला शिकवण मिळते की, कधीही आशा गमावू नका आणि शांत रहा.

    दरम्यान, धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here