आमदार रोहित पवार यांची उपरोधिक टीका
नगरः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचे ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
‘आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांतसिंह प्रकरणातून भाजपने राज्याचा नावलौकिक घालवण्याचेच काम केले. जनता तुम्हाला माफ करणार नाही,” अे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.