Shirurkasar : सततच्या पावसामुळे मुग पिकाचे नुकसान; भरपाईची मागणी 

0
सरपंच गर्कळ यांच्यासह ईंजि.बडे, जरांगे, नागरगोजे यांची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिरूरकासार – संपूर्ण शिरूरकासार तालुक्यात खरिप हंगामातील मुग या पिकाचे सततच्या संततधार पावसामुळे
प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिरूरकासार तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे व कृषी अधिकारी शिरूर यांच्याकडे सरपंच देविदास गर्कळ,अभिमान जरांगे, ईंजि.एम.एन.बडे,माऊली नागरगोजे,सुदाम काकडे,छबुबाई राख यांच्यासह अनेक गावच्या सरपंचासह शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी शेतकऱ्यांचे खरिप पिंकाचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसाने मुग या पिकाची पूर्ण वाट लागली आहे. ऐन काढणीत आलेला मुग संततधार पावसाने गळून खाली पडला अन् पुन्हा तो उगवून वर आला. त्यामुळे शेतकरी राजाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी अनेक गावच्या सरपंच, सामाजिक कार्यकर्ते शेतकरी यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर घोगस पारगावचे सरपंच देविदास गर्कळ, भाजपाचे सरचिटणीस ईंजि.एम.एन.बडे,मातोरीचे सरपंच अभिमान जरांगे, माळेगावचे सरपंच माऊली नागरगोजे, वारणीचे बाबुराव केदार, गोमळवाड्याचे सुदाम काकडे,येळंब चे विष्णू नितळ,, बोरगावच्या छबुबाई राख,सावळेराम जायेभाये, राळसांगवी श्रीमंत खेडकर, उकांडाचे विजय सानप, अंबादास गोरे,अरुण खेडकर यांच्या सह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here