प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही महिने लाॅकडॉऊन असल्याने या काळात अनेकांचा रोजगार हिरावला. यामुळे नगरपरिषदेने किमान सहा महिन्यांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. जनतेला आधार द्यावा या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक संजय भागवत व ज्येष्ठ नेते विलास रोडी यांनी नगराध्यक्ष डॉ.मृत्यूंजय गर्जे यांना दिले.
पाथर्डी तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून राज्यभरात ओळखला जातो. तसेच तालुक्यातील हजारो ऊस तोडणी कामगार राज्यभरात ऊसतोडीसाठी जात असल्याने वर्षातील सहा ते आठ महिने शहर परिसरासह तालुक्यातील आर्थिक उलाढाल तुलनेने कमी असते. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्याने या काळामध्ये बांधकाम व्यावसायिक, कापड व्यावसायिक, छोटे-मोठे टपरीधारक, सर्व प्रकारचे कामगार व मजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्याने सर्व मालमत्ताधारक मेटाकुटीस आले आहेत. अनेकांना घर खर्च भागवणे देखील मोठ्या जिकरीचे झाले आहे.
तसेच पुढील आणखीही काही महिने कोरोनाशी लढा देऊनच आपणाला जगायचे असल्याने,आलेले संकट अद्यापही पूर्णपणे दूर झालेले नाही. अशा संकटाच्या काळामध्ये पाथडी नगरपरिषदेने नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून किमान सहा महिन्यांची घरपट्टी व नळपट्टी माफ करून जनतेला आधार देण्याचे काम करावे, अशी मागणी भागवत व रोडी यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक नामदेव लबडे उपस्थित होते.
सध्याच्या संकट काळामध्ये आपण केलेली मागणी योग्य असली तरी देखील यावर कायदेशीर रित्या मार्गदर्शन घेण्यात येईल.व नगरपरिषदेच्या आगामी मासिक बैठकीमध्ये यावर नागरिकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे नगराध्यक्ष डॉ.गर्जे म्हणाले.
discount tadalafil – generic tadalafil canada tadalafil prices