Shrigonda : दारुच्या नशेत काष्टी येथे भर चौकात हातात कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा तरुणाचा प्रयत्न

0

ग्रामस्थांनी दिला चोप, तरुण पोलिसांच्या ताब्यात, आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल, यापूर्वीही तरुणावर अनेक गुन्हे

वेळ सायंकाळी पाच वाजण्याची सर्व लोक आपले काम आवरून आपल्या घरी जात होते परंतु एक वीस वर्षीय तरुण दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन भररस्त्यात उभा राहून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना हातातील कोयता दाखवून दहशत निर्माण करत होता शिवीगाळ करत होता,कोयता दिसेल त्याला फेकून मारत होता परंतु सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही ही घटना काल दि19 रोजी सायंकाळी काष्टी गावात घडली असून हत्यारबंद तरुणाने काष्टी गावातील मुख्य रस्त्यावर महालक्ष्मी चौकात घातलेल्या या गोंधळामुळे काष्टी गावात मात्र चांगलीच दहशत पसरली होती.

गावातील काही जेष्ठ नेत्यांनी या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता शेवटी ग्रामस्थांनी या तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला या घटनेमुळे मात्र सगळीकडे एकच खळबळ उडाली सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या वैभव सुभाष चौधरी वय20 वर्षे रा काष्टी शिवार चौधरीमळा याच्याकडील कोयता काढून घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पो कॉ योगेश दळवी यांच्या फिर्यादीवरून चौधरी याच्या विरोधात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणाविरोधात या आधिसुद्धा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास सहायक फौजदार भानुदास नवले करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here