Shrigonda : काष्टी सोसायटीच्या गैरकारभाराची चौकशी सुरू करण्याचा आदेश जारी – राकेश पाचपुते

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील काष्टी वि का सेवा सह सोसायटीमध्ये होत असलेल्या गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते व प्रा सुनिल माने यांनी सहकार मंत्री,सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्याची सहकार खात्याने गंभीर दखल घेऊन काष्टी सोसायटीच्या गैरकारभाराच्या तक्रारीबाबत सविस्तर चौकशी करून त्याचा चौकशी अहवाल तीन महिन्यात कार्यालयात सादर करावा असा, लेखी आदेश श्रीगोंदा सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी पारित केला आहे.

चौकशी करण्यासाठी जामखेड येथील सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. काष्टी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते हे संस्थेचा वापर स्वतःच्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी करत असल्याची टीका पाचपुते व माने यांनी केली आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापक जे एम पाचपुते यांनी पोलीस स्टेशनला नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी, वर्षानुवर्षे विविध विभागातील खरेदी ही ठराविक व्यापाऱ्यांकडून होत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची खरेदी ही सदोष पद्धतीने होऊन त्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची श्यक्यता, नियमबाह्य कर्जवाटप, सोसायटीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात सहकार खात्याला अंधारात ठेवून आर्थिक घोटाळा करणे, व्यापाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू, सहली यांची चौकशी करणे, संचालक वाढ, घट, कर्मचारी बोनस व जादा मेहनताना, यासह विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी सहकार खात्याकडे केली होती. त्यानुसार आता काष्टी सोसायटीच्या कारभाराची चौकशी होणार आहे. तसेच सोसायटीची वार्षिक उलाढाल 200कोटींवरून 45 कोटींवर कशी आली याला जबाबदार कोण हे सुद्धा सर्व सभासद आणि तालुक्यातील जनतेसमोर लवकरच येईल, असे देखील पाचपुते व माने यांनी म्हंटले आहे.

आरोपांमध्ये तथ्य नाही/-भगवानराव पाचपुते-

माजी अध्यक्ष काष्टी वि का सेवा सहकारी सोसायटी काष्टी सोसायटीच्या कारभाराबाबत होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही, सहकार खात्याकडून होणाऱ्या चौकशीला आपण सामोरे जाऊ, सर्व आरोप चुकीचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here