आगामी शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून?

0

उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावाला युजीसीचा पाठिंबा

अंतिम वर्षाच्या परीक्षांवर झालेल्या वादातून युजीसी आणि महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आमने सामने ठाकले आहेत. असे असताना उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करावे, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मात्र युजीसीने पाठिंबा दिला आहे. 

शिक्षण विभागातील सर्व उणीवा, अडथळे दूर करण्याची, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सर्व अडचणी दूर कराव्या, असा प्रस्ताव होता. कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत, त्या तात्काळ तपासून पाहाव्यात, असा आग्रहही उद्धव ठाकरे यांनी केला.

दरम्यान, केंद्राने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) कसे राबवायचे याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक समिती नेमणार आहे. समितीत राज्यभरातील विविध विभागातील शिक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here