प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नेवासा – तालुक्यात कोरोनाने चांगलाच कहर केला असून आज तालुक्यात एकूण ३२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज नेवासा फाटा येथील कोरोना विलगीकरण कक्षात एकूण १२९ अँटीजन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात २८ रुग्ण तर खाजगी लॅबमध्ये ३ व सिव्हिल लॅब मध्ये १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
खाजगी लॅबमधील रुग्ण-
कुकाणा-३, सिव्हिल लॅब- सोनई-१
अँटी जण रॅपिड टेस्टमधील रुग्ण-
नेवासा खु.-२
शिरेगाव-३
कुकाणा-४
खूपटी-४
गिडेगाव-६
भेंडा बु-२
नेवासा बु-३
खडका-१
घोगरगाव-२
शिंगवेतुकाई-1
असे तालुक्यात ३२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर २४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.