Shrirampur : नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – आदिक

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले. श्रीरामपूर येथील नाट्य कलाकारांना राज्य स्तरावरील पुरस्कार तसेच प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

नगरसेवक रवी पाटील, ऍड. प्रसन्ना बींगी, विजय नगरकर, माणिक जाधव, नाना कर्डीले, अशोक कर्णे सर, आदी मान्यवर उपस्तीत होते सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात आदिक म्हणाल्या की नाट्यगृह हे माझ्या वडिलांच्याच नावे आहे. नाट्यगृह सुरू होण्यासाठी माझी फार तळमळ आहे पण काही तांत्रिक अडचणी मूळे ते सुरू करता येत नाही. आज श्रीरामपूरतील नाट्य कलाकारांनी आपल्या गावचे नाव राज्य पातळी देश पातळी व जागतिक पातळी वर नेऊन पोहोचवले आहे. त्याचा सार्थ अभिमान मला आहे. त्या सर्वांचे श्रीरामपूर नगर परिषद आदिक कुटुंबीय यांच्या वतीने अभिनंदन करते. नाट्यगृहासाठी लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावू श्रीरामपूरच्या कलाकाराणी एक नाट्य प्रयोग करूनच त्या नाट्यगृहाचे उद्घाटन करू.

याप्रसंगी नाना कार्डिके, अशोक कर्णे सर, नगरसेवक रवी पाटील, ऍड. प्रसन्न बिंगी, संदीप कदम, शाम श्रीवास्तव, आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात संदीप कदम, शाम श्रीवास्तव, रवी जावरे, कराटे चॅम्पियन वसीम शेख, यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे अशी सर्व कलाकारांच्या वतीनं सूचना करण्यात आली. त्यात अजय घोगरे, प्रकाश ढोणे, नवनाथ कर्डीले, नाना कर्डीले, अशोक कर्णे सर, दीप्तेश विसपुते,कासिम सय्यद, किरण उबाळे, आश्विनी परदेशी, मयूर वाकचौरे, गणेश करडे, अवधूत कुलकर्णी, विनोद वाघमारे, दिव्या गायकवाड, शर्वरी साळुंके, ऋतुजा धुमाळ, आदी कलाकारांनी केली होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नगरकर यांनी केले सूत्र संचालन अजय घोगरे यांनी केले आभार नवनाथ कर्डिले यांनी मानले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here