विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी समस्यांमुळे केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या वाहनांची रेंज आणि किंमत मोठी अडचण आहे. तसेच चार्जिंग स्टेशनही जवळपास नाहीतच. अशा अनेक अडचणींमुळे इलेक्ट्रीक वाहनांचा काळ येण्यास मोठा अवधी जाणार आहे. मात्र, यावर आयआयटी मुंबई आणि शिव नादर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे की, एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी असलेले वाहन तब्बल 1600 किमीचे अंतर कापणार आहे.
सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. टाटा नेक्स़ॉन 300 किमीची रेंज देते. यापुढे काही अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या बॅटरींमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. यापेक्षा पर्यावरणाला अनुकुल असे लिथियम-सल्फरच्या बॅटरींचे उत्पादन घेतले जाऊ शकते. असे तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले आहे.
discount tadalafil – tadalafil canadian pharmacy tadalafil 20