प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
फडणवीस आणि मी एकत्र येणार, असे म्हटले की लगेच ब्रेकिंग न्यूज होते, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्सिजनयुक्त 200 बेडचे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार यांनी कार्यक्रमाला मी आणि फडणवीस एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. आणि त्याची ब्रेकिंग न्यूज झळकत होती. मात्र, त्यांना माहित नव्हते की कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे येणार आहेत. अशी मिश्कील टोले बाजी अजित पवारांनी केली.
“गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असे अजित पवार म्हणाले.
tadalafil prescription online – tadalafil coupon generic tadalafil 20mg