Kolhapur : ‘विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे बिळात बसलेले बाहेर येतील’

1

मंत्री हसन मूश्रीफ यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलावर जहरी टीका

प्रतिनिधी | अनिल पाटील | राष्ट्र सह्याद्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी कोल्हापूरात येत आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. ते ज्या सूचना करतील त्यांचेही मी स्वागत करतो. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त एक चांगली गोष्ट होईल, भाजपचे या परिसरातील स्थानिक पदाधिकारी, नेते जे बिळात लपून बसले होते. ते बाहेर येतील आणि गेली पाच-सहा महिने आम्ही जो संघर्ष करत आहोत तो त्यांना दिसेल, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी दोनच गोष्टी कराव्यात, अलमट्टीची उंची वाढू देऊ नये आणि मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसविण्याबाबत कर्नाटक सरकारला सांगावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. अलमट्टीप्रश्नी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करू असे सांगितले, त्याचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले, की पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंगळूर येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करु, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here