प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सफाई कामगारांच्या विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वयसाधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार. नियुक्ती बाबतीत शैक्षणिकअर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

tadalafil professional – buy tadalafil online safely buying tadalafil online safely