प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेवगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशन संचलित ३५ बेडचे अद्ययावत साई कोविड सेंटर शेवगाव शहरात तयार करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विकास बेडके व सेक्रेटरी डॉ. मयूर लांडे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यात कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांच्या सोयीसाठी नगर रस्त्यावरील साई लॉन्स येथे हे साई कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन मशिन, बायपॅप मशीन यासह सर्व बेड हे ऑक्सिजन सहित असे ३५ बेड या सेंटरमध्ये आहेत.
रूग्णांच्या उपचारासाठी जनरल वॉर्ड विलगीकरण कक्ष, आयसीयू (व्हेंटिलेटर शिवाय विलगीकरण कक्ष) व व्हेंटिलेटरसह विलगीकरण कक्ष असलेला आयसीयू वार्ड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही रूग्ण उपचारासाठी दाखल झाले असून शासनाच्या जाहीर केलेल्या दराने उपचाराचे बील आकारले जाणार आहे.
तालुकाध्यक्ष डॉ. विकास बेडके व सेक्रेटरी डॉ. मयूर लांडे, फिजीशियन डॉ. सुयोग बाहेती, डॉ. सुशील कबाडी, डॉ. संजय लड्डा, डॉ. गणेश चेके, डॉ. अमित फडके, डॉ. आशिष लाहोटी, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी, डॉ. किरण वाघ, डॉ. दिनेश राठी आदींसह डॉक्टर असोशिएशनचे सदस्य या ठिकाणी वैद्यकिय सेवा देणार आहेत. साई लॉन्सचे मालक व बाजार समितीचे संचालक संजय फडके यांचे या कामी विशेष सहकार्य लाभल्याचे डॉ. बेडके यांनी सांगितले.
buy tadalafil – generic tadalafil canada buy tadalafil online reddit