Srirampur : वांगी बुद्रुक येथील रस्त्याचा बट्ट्याबोळ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आक्रोश

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ते गणेश खिंड रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यासंदर्भात लोकप्रतिनिधींना वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करून देखील रस्त्याचा प्रश्न मिटलेला नाही. रस्त्याने चालता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वांगीमधील ग्रामस्थांना वांगी शिवार शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी तसेच श्रीरामपूरकडे जाण्यासाठी वांगी गाव ते वांगी फाटा रस्त्याचा वापर करावा लागतो. परंतु पण चालू झाल्यानंतर पहिला पाऊस झाल्यापासून वांगी गावच्या रस्त्याने मोटारसायकल चालवणे जिकरीचे झाले आहे. रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेले चित्र दिसून येत असल्या कारणाने ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींवर नाराजी दिसून येत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे नाहीतर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पाच ते सहा वर्षापासून लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने रस्त्याची बिकट परिस्थिती बदलली आहे याचा त्रास वांगी बुद्रुक ग्रामस्थांना तसेच आसपासच्या ग्रामस्थांना करावा लागत आहे.
                 –  माजी सदस्य बाळासाहेब नरोटे
वांगी गाव ते गणेश खिंड चार किलोमीटरचा रस्ता या रस्त्याची बिकट परिस्थिती तयार झालेली आहे. गणेश खिंड गणपती मंदिरामुळे आसपासच्या दहा तेवीस गावांचा संपर्क येत असल्याकारणाने येणाऱ्या-जाणाऱ्या भक्त तसेच ग्रामस्थांना त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून स्त्याचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू.
                 – माजी सरपंच संजय भिसे
आमचे गावातील आराध्य दैवत बिरोबा महाराज मंदिर ते गणेश खिंड रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. पाच ते सहा वर्षापासून लोकप्रतिनिधींचे असलेले दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने पायी चालणे सुद्धा मुश्कील आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम चालू करावे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.
                 –  विनोद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here