Shirurkasar : उद्धवा अजब तुमचे सरकार; भोंगा शाळेने शिक्षकच होणार बेजार

0
प्रातिनिधीक छायाचित्र
चारभिंतीच्या आत शिकवले, भोंग्याने आता समजणार का?
प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे | राष्ट्र सह्याद्री 

राज्य सरकारने कोरोनाच्या महासंकटातून लहान विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी जूनमध्ये शाळा उघडल्याच नाहीत. तीन महिन्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ग्रामीण भागात भोंगा शाळा गावागावात प्रभावीपणे राबण्याचे शिक्षण विभागाने ठरवले असले तरी चारभिंतीच्या आत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समजेल का? असा प्रश्न उपस्थित होत असून शिक्षकांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे.
कोरोनाच्या कहराने देशभर कहर माजवल्याने सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात
असंख्य देशवासियांचा मृत्यू झाला. अदृश्य असलेल्या या महामारीने जगाला त्रस्त करून सोडले. त्यामुळे देशभर केंद्र सरकारने भावी पिढीच्या हितासाठी शाळा सुरू केल्या नाहीत. हे जरी खरे असले तरी हे नुकसान भरून येणारे नाही . त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी विलंब झाला असला तरी आता भोंगा शाळा सुरू करण्याचे जाहीर करून अंमलबजावणी आज सोमवारपासून सुरू होत आहे. खरे पाहिले तर कोणत्या शेख चिल्ली अधिका-यांनी ही शक्कल लढवली. हे मात्र कळाले नसले तरी, समग्र शिक्षा अभियान मार्फत राबविण्यात येत असलेल्या भोंगा शाळा राबविण्यात येत
असली तरी यात अनंत अडचणी आहेत.
अख्खा उन्हाळा जिल्हा परिषद असो नाही तर सर्वच निम शासकीय शाळेच्या शिक्षक बांधवांनी ईमानदार सेवा केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या परंतु देशाची भावी पिढी घडवणा-या शिक्षकांनी कधीही कच खाल्ली नाही. कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. आजही शिक्षक हमालासारखे काम करत आहेत, असे असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देत असून उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील ग्रामीण भागात भोंगा शाळा सुरू करण्याची शक्कल लढवली आहे.

मात्र, ग्रामीण भागात गावात कमी अन् शेत वस्ती वर राहणाऱ्या लोकांची जास्त झालेली आहे. गावात भोंगा वाजवून शिक्षण देण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल. हा येणारा काळच सांगेल पण चार भिंतीच्या आत शिक्षण घेणाऱ्या अबाल विद्यार्थ्यांना हे शिक्षण कितपत समजेल हे मात्र प्रश्न चिन्ह आहे. यावर अनेक शिक्षकांनी देखील आपल्या शंका व्यक्त केल्या आहेत. आजपासून सुरू होत असलेली भोंगा शाळा सर्वच शिक्षकांना बेजार करणार हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here